By  
on  

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या जादुई आवाजातील हे गाणं तुम्ही ऐकलंत का?

'प्रेमवारी' या सिनेमाचे गाणं 'बघता तुला मी' प्रदर्शित झाले आहे. एकमेकांना पाहिल्यावर जी प्रेमाची उत्कट भावना जाणवते ती या गाण्यातून सांगितली गेली आहे. चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे ही फ्रेश जोडी या गाण्यात झळकते आहे.
एक हलकं फुलकं पण तितकंच रोमँटिक असे हे 'बघता तुला मी'  गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केले असून मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीतबध्द केले आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असे हे गाणं त्र्यंबकेश्वर जवळ चित्रित करण्यात आले आहे. गुरु ठाकूर आणि मंदार चोळकर यांनी अतिशय समर्पक शब्दात प्रेम ही भावना मांडली आहे. तर सुजित कुमार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले.
प्रेमाला प्रत्येकजण आपल्या चौकटीत मांडत असतो. कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे. कोणासाठी प्रेम म्हणजे समर्पण आहे. तर कोणासाठी प्रेम म्हणजे त्या विशिष्ट व्यक्तीची सोबत आहे. अशाच काहीशा  संकल्पनेवर आधारित 'प्रेमवारी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  या सिनेमात  चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'प्रेमवारी' हा सिनेमा व्हॅलेंटाइन डेच्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाचे  लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.

 

https://youtu.be/tX519UL8XG0

Author

Recommended

PeepingMoon Exclusive