पेपर गुंडाळलेल्या ड्रेसच्या फोटोनंतर साडीतल्या फोटोंचीं होत आहे चर्चा, ही आहे ती डान्सिंग क्विन

By  
on  

'युवा डान्सिंग क्विन'मध्ये एकापेक्षा एक नृत्य सादर करणारी कृतिका गायकवाड या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीयावर चर्चेत आली आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे तिचे फोटो. कृतिकाने काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र अंगाभोवती गुंडाळलेला ड्रेस घालून काढलेले फोटो पोस्ट केले होते. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. आणि तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आले. चर्चाच नाही तर हे फोटो व्हायरल झाले होते.


त्यानंतरही कृतिकाचे विविध ग्लॅमरस फोटो चर्चेत आले होते. सध्या लॉकडाउनमध्ये कृतिका ही घरातच तयार होऊन विविध फोटोशूट करत आहे. आणि ते फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करतेय.


नुकतेच कृतिकाने साडी नेसून काढलेले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंनाही नेटकऱ्यांची पसंती मिळालेली दिसत आहे. कृतिकाचा साडीतला हा लुक चांगलाच पसंत केला जात आहे.

कृतिका गायकवाड ही तिच्या सोशल मिडीयावर आणखी काय पोस्ट करेल यासाठी तिचे फॉलोवर्स वाट पाहत असतील यात शंका नाही.

 

Recommended

Loading...
Share