मराठी कलाकारांचं हे लॉकडाउन फोटोशूट पाहिलं का ? तेजस नेरुरकरने टिपले कलाकारांचे हे क्षण

By  
on  

प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकर त्याचा विविध संकल्पनेसाठीही प्रसिद्ध आहे. लॉकडाउनमध्ये अशीच एक संकल्पना घेऊन तो आला. तेजसने फोन टू फोन फोटोग्राफीच्या माध्यमातून मराठी कला विश्वातील कलाकाराचे घरातूनच फोटोशूट केलं. त्याचं हे अप्रतिम फोटोशूट सगळ्यांनाच प्रचंड आवडलं होतं.
आणि याच फोटोशूट संकल्पनेचा दुसरा भाग तेजसने प्रदर्शित केला आहे. या भागातही काही मराठी कलाकारांचे फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. 

यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, सचिन पिळगावकर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, महेश काले, प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे, आर्या आंबेकर, समिर चौगुले, मृण्मयी देशपांडे, क्रांति रेडकर, निपूण धर्माधिकारी, अभिजीत पानसे, अमित फाळके, प्रिया बापट, पुष्कर क्षोत्री, अमेय खोपकर, निखिल साने, लोकेश गुप्ते, अनीश जोग, दिगपाल लांजेकर, गुरु ठाकूर, अश्विन पाटील, निखील महाजन, रोहन मापूसकर यांच्यासह कित्येक कलाकारांचे हे फोटोशूट आहे. प्रत्येक कलाकारासोबत विविध प्रकारे हे फोटो काढण्यात आले आहेत. 

प्रत्येक फोटोसोबत एक सकारात्मक मेसेजही यात जोडला गेलेला आहे. 

Recommended

Loading...
Share