लॉकडाउनमध्ये सौदर्यवतींच्या घायाळ करणाऱ्या अदा आणि साडी स्वॅग, या मिस करत आहेत त्यांचा हा साडी लुक

By  
on  

लॉकडाउनमुळे बहुतांश कलाकार त्यांच्या सोशल मिडीयावर आधी पेक्षा अधीक सक्रीय झाले आहेत. त्यातच लॉकडाउनच्या काळात सध्या मराठमोळ्या सौंदर्यवती त्यांच्या सोशल मिडीयावर विविध फोटो पोस्ट करत आहेत. विविध लुक, पेहराव असलेले त्यांचे हे फोटो त्यांच्या चाहत्यांना आवडतातच. पण लॉकडाउनमध्ये बाहेर पडता येत नसल्याने काही अभिनेत्री घरातच साडी नेसून तयार होऊन फोटोशूट करत आहेत.
तर काही अभिनेत्री त्यांचा जुना साडी लुक मिस करत आहेत. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यामातून सुरु असलेला थ्रोबॅक ट्रेंड या सौंदर्यवती त्याचे साडीतले जुने फोटो पोस्ट करूनही फॉलो करत आहेत. 


अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच तिचा मेहंदी रंगाच्या सुंदर साडीतला गॉर्जियस फोटो पोस्ट केला आहे. विविध पेहरावात साडी हे तिचं पहिलं प्रेम असल्याचं ती या कॅप्शनमध्ये म्हणतेय. 


तर अभिनेत्री आणि वेब स्टार मिथिला पालकरनेही काही दिवसांपूर्वी असाच साडीतला सुंदर फोटो पोस्ट केला होता. मिथिलाला बहुदा वेस्टर्न आउटफिटमध्ये पाहिलं गेलय. त्यामुळे तिचा हा साडी स्वॅग तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता.

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीनेही नुकताच तिचा एक लाजरा फोटो पोस्ट केला आहे. “जुनं ते सोनं” असं म्हणत काळ्या रंगाच्या साडीतला हा फोटो सोनालीने पोस्ट केला आहे. काळ्या रंगाच्या साडीत अप्सरा सोनालीचं सौंदर्य हे अजून खुलून आलेलं दिसतय.


‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया फेम रसिका सुनीलनेही काही दिवसांपूर्वी असाच सारी लुक पोस्ट केला होता.  जांभळ्या रंगाच्या साडीतला रसिकाचा हा लुक तिच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडला.


अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं हे सारी लव्ह तर लॉकडाउनच्या आधीपासून पाहायला मिळालं. तेजस्विनीने तिच्या आईची साडी नेसून पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत राहिला होता.

यासह ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिएलिटी शोमधील डान्सिंग क्विन कृतिका गायकवाड आणि आयुषी भावे यांनीही त्यांचे साडी लुक पोस्ट केले होते. 
मराठीमोळ्या या सौंदर्यवतींचं हे सारी लव्ह सोशल मिडीयावर सध्या पाहायला मिळतय. त्यांचा हा साडीतला स्वॅग लुक सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे. 

Recommended

Loading...
Share