By  
on  

या दिवसाची वाट पाहतोय अभिनेता देवदत्त नागे, फोटो केला पोस्ट

'जय मल्हार' या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागेने त्याचं कला विश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विविध मालिकांमधून आणि त्यानंतर तान्हाजी सारख्या मोठ्या हिंदी सिनेमातूनही तो झळकला. त्याची भारदस्त शरीरयष्ठी, भारदस्त आवाज आणि लुकमुळेही त्याचं हटके व्यक्तिमत्त्व समोर आलं. आणि याच फिटनेससाठी देवदत्त हा प्रचंड मेहनत घेत असतो. 

देवदत्तच्या या व्यायाम प्रकारात तो सायकलिंगचाही समावेश करतो. 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याच दिवसाची देवदत्त आतुरतेने वाट पाहत आहे. म्हणूनच त्याने त्याचा सायकलसोबतचा फोटो त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. नियमीत सायकल चालवणे हे देखील व्यायाम प्रकारात मोडतं. त्यामुळे देवदत्त त्याच्या फिटनेससाठी सायकलही चालवत असतो. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive