‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतील सूमी हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. अभिनेत्री अमृता धोंगडे ही भूमिका साकारत आहे. सोशल मिडीयावरही अमृताला असंख्य चाहते फॉलो करत असतात.
सध्या चित्रीकरण बंद लॉकडाउनमध्ये अमृता घरीच आहे. मात्र या लॉकडाउनमध्ये अमृता एक नवी कला शिकत आहे. नुकतेच तिने सोशल मिडीयावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात अमृताने गणपती बाप्पाचं चित्र काढलेलं पाहायला मिळतय.
या पोस्टमध्ये ती लिहीते की, “या लॉकडाउनमध्ये मी काय शिकली आहे ते बघा. मी यात प्रोफेशनल नाही पण पहिल्यांदा प्रयत्न केला आहे. आशा करते की तुम्हाला आवडेल. तुम्हाला आवडल्यास कमेंटमध्ये कळवा आणि मला सांगा की तुम्ही लॉकडाउनमध्ये कसा वेळ घालवत आहात ते ?”
अमृताच्या या कलेचं सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. लॉकडाउनच्या काळात अमृता तिचा हा चित्रकलेचा छंद जोपासत असल्याचं समोर आलं आहे..
अमृता ही ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेमुळे सूमी म्हणून प्रसिद्ध आहे.