By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकर या गोष्टीमुळे स्वत:ला समजते नशीबवान

विनोदाचा बादशहा अभिनेता अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यापैकी काही कलाकारांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. 'साडे माडे तीन' या मराठी सिनेमात अमृता झळकली होती. तेव्हा अमृताच्या करियरची नुकतची सुरुवात होती.

साडे माडे तीन सिनेमातील फोटो पोस्ट करत अमृताने अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "मामा, अशोक सराफ सर, मी स्वत:ला नशीबवान समजते की कारण करियरच्या सुरुवातीलाच तुमच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा."

 

करियरच्या सुरुवातीला अमृताला अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असल्याचा तिला आनंद आहे आणि यासाठी ती स्वत:ला नशीबवान समजते. सोशल मिडीयावर बरेच कलाकार या लाडक्या अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive