By  
on  

पाहा Video : अभिनेत्री पूजा सावंतने अशा दिल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा 

जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने सोशल मिडीयावर पर्यावरणाच्या संवर्धनासाठीचे विविध मेसेज आणि पोस्ट केल्या जात आहेत. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार पर्यावरण संबंधित विविध गोष्टींचं आवाहनही करत आहेत. यात पर्यावरणाचा भाग असलेले प्राणी हे देखील महत्त्वाचे आहेत. हाच महत्त्वाचा संदेश देत आहे अभिनेत्री पूजा सावंत.

पूजाला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. ती एक प्राणीप्रेमी आहे हे बहुतांश लोकांना माहित आहे. पूजा कुठेही गेली की तिथे असलेल्या प्राण्यांकडे ती ओढली जाते. असाच एक गोंडस व्हिडीओ पूजाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये पूजा म्हणते की, “प्रत्येक जीव हा महत्त्वाचा, चला आपल्या पर्यावरणाचं एकत्र संरक्षण करुयात”

या पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जीवाला महत्त्व देणं गरजेचं असल्याचं ती या पोस्टमधून सांगते.
  
 

Recommended

PeepingMoon Exclusive