अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नव्या पॉडकास्ट शोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोनाली सांगते ऐका या शोमध्ये सोनाली तिच्या आयुष्यातील विविध गोष्टी प्रत्येक भागात शेयर करतेय.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सोनालीच्या पॉडकास्टच्या भागात सोनाली देशाबाहेरील प्रवासात आलेले विविध अनुभव सांगते. सोनालीची देशाबाहेर पहिल्यांदा केलेली सफर होती पॅरिसची. एका कार्यक्रमासाठी सोनाली आणि तिची टीम गेली होती. यावेळी या प्रवासत एका कृष्णवर्णीय व्यक्ती ड्रायव्हर म्हणून होता. तेव्हा ती व्यक्ती चुकीच्या ठिकाणाहून गाडी न्हेत असल्याचा संशय आल्याचा प्रसंग ती सांगते. मात्र त्याने सुखरुप योग्य ठिकाणी पोहोचवलं असल्याचं ती म्हटली. सध्या अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय माणसाच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. याच पार्श्वभूमिवर ती तिचा हा प्रसंग शेयर करतेय. मात्र प्रवासात भेटलेल्या त्या माणसाविषयी झालेला गैरसमज सोनाली या पॉडकास्टमध्ये सांगते.
याविषयी सोनाली म्हणते की, “माणूस म्हणून माणसावर विश्वास ठेवणं गरजेचं. रेसिझम याबाबतीत अशा बातम्या वाचताना ऐकताना खूप वाईट वाटतं.”
शिवाय स्वित्झरलँडच्या ट्रीपवेळी भारतात विझा इमिग्रेशन कार्यालयात आलेला विचित्र अनुभवही ती या भागात सांगते. सोनाली आणि तिच्या टीमला डान्स करून दाखवण्याची मागणी केली गेली असल्याचा विचित्र अनुभव सोनालीने या भागात सांगीतला आहे.
लंडनला वर्ल्डकप क्रिकेट सामन्याचा अनुभवही सोनाली यात सांगते.तिच्या भारताबाहेरील विविध ट्रीपचे अनुभवही सोनाली कुलकर्णीने शेयर केले आहेत. तिचे हे अनुभव ऐकण्यासाठी सोनालीचा हा पूर्ण ऑडिओ पॉडकास्ट नक्की ऐका.