By  
on  

फियान्से कुणालसोबत सोनाली कुलकर्णीची सायकलस्वारी

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा पार पडला होता. लॉकडाउनच्या काळात सोनालीने याविषयीची गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून सगळ्यांना दिली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Before my birthday ends, I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT!!! Introducing my fiancé Kunal Benodekar! @keno_bear आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला, आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...!!! #sakharpuda #engaged #palindrome #02022020 #precovid #engagement #fiancé Thank you @yashkaklotar for capturing our moment!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

 

लॉकडाउनच्या काळात सध्या सोनाली ही दुबईत फियांसे कुणालसोबत आहे. दुबईत कोरोनाचा धोका कमी असल्याने तिथे परिस्थिती सुरळीत झाली आहे. यातच सोनाली आणि कुणाल सायकल राईडचा आनंद लुटत आहेत. याचा फोटो सोनालीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटरवर पोस्ट केला आहे. 

नुकताच सोनालीचा वाढदिवसही पार पडला होता. यावेळी कुणालसोबत हा वाढदिवस सोनालीने साजरा केला होता. सोनालीने नुकतच चाहत्यांसोबत केलेल्या लाईव्ह सेशनमध्येही तिने सगळ्यांना कुणालची ओळख करुन दिली होती. यावेळी त्याला मराठीतून बोलायला लावलं होतं. शिवाय उखाणा घेण्याची तयारी झाली असल्याचं सोनाली यावेळी म्हटली होती. पुढील वर्षी सोनाली लग्न करत असल्याचं तिने या लाईव्हमध्ये सांगीतलं होतं. 

सध्या दुबईत सोनाली आणि कुणाल त्यांचा क्वालिटी टाईम घालवत आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive