By  
on  

मल्टीस्टारर ‘आसूड’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटातून मराठीतले हे दिग्गज आपल्याला एकत्र आलेले पाहायला मिळणार आहेत.

विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंतयांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारेराणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात झळकणार आहेत.

अन्नदाता शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पण सद्यस्थिती अशी आहे कि, हाच शेतकरी आज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्याच्यासाठी निर्माण केलेल्या योजना, सोयी-सुविधा आज त्याचापर्यंत पोहोचतच नाही. शेतकऱ्याच्या या विदारक परिस्थितीवर ‘गोविंद प्रोडक्शन्स’ प्रस्तुत ‘आसूड’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. अॅक्शन, इमोशन च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि सरकारी यंत्रणा यावर ज्वलंत टीका करणारा आणि सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा असा राजकीय थरारपट ‘आसूड’च्या निमित्ताने प्रेक्षकांना ८ फेब्रुवारीला बघता येणार आहे. 

चित्रपटाची निर्मिती डॉदीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेबजळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथापटकथा आणि संवाद निलेशरावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. धनराज पाटील लाहोळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive