लॉकडाउनच्या काळातही मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या सोशल मिडीयावरील पोस्ट या सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही अशा सकारात्मक पोस्ट करत असते. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये ती लिहीते की, “दिवसा स्वप्न पाहण्याची कला, लॉकडाउनमुळे तुमच्या स्वप्नांना मरु देऊ नका, तुमचा त्याच्यावर ताबा आहे.”
लॉकडाउनमध्ये खचून न जाता दिवसाही स्वप्न बघण्याचा सकारात्मक संदेश सोनाली यातून देत आहे. लॉकडाउनमध्ये सोनालीने तिचा पॉडकास्ट शो देखील सुरु केला आहे. ‘सोनाली सांगते ऐका’ या पॉडकास्ट शोमध्ये सोनाली तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींविषयी दिलखुलास बोलते.
सोनाली सध्या फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. तिथे कुणालसोबत सोनाली क्वालिटी टाईम घालवत आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडाही झाला आहे.