By  
on  

‘लव्ह यु जिंदगी’ म्हणत थुकरटवाडीत येणार ‘नशीबवान’ मंडळी

नेहमीप्रमाणे यावेळीही थुकरटवाडी आणि थुकरटवाडीकर सज्ज झालेत प्रत्येकाला हसवायला. प्रत्येक आठवड्याला थुकरट्वाडीत कोण पाहुणे येणार याची उत्सुकता प्रेक्षकालाही असतेच.

यावेळीही थुकरटवाडीत अशीच खास पाहुणेमंडळी येणार आहेत. यावेळी थुकरटवाडीत ‘लव्ह यु जिंदगी’ची टीम आणि ‘नशीबवान’ या सिनेमाची टीम येणार आहे.

‘लव्ह यु जिंदगी’ या सिनेमातील सचिन पिळगावकर आणि प्रार्थना बेहरे हे कलाकार येणार आहेत. यावेळी थुकरटवाडीकर धमाल स्कीट करून निखळ मनोरंजन करतील यात शंका नाही. विशेष म्हणजे ‘होऊ दे व्हायरल’ हे देखील आता अंतिम ट्प्प्यापर्यंत आलं आहे. त्यामुळे या पर्वातील विजेता कोण असेल याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

यावेळी थुकरटवाडीकर ‘माझा पती करोडपती’ या सिनेमातील प्रसंगाचं स्कीट सादर करणार आहेत यामुळे हा एपिसोड धमाल होईल यात शंका नाही.

https://twitter.com/zeemarathi/status/1081589139437481984

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive