झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी हा रविवार ठरणार महा रविवार, का ते जाणून घ्या

By  
on  

सगळ्या महाराष्ट्रात आपल्या दर्जेदर मालिकांनी प्रेक्षकाच्या मनात स्थान निर्माण करणा-या झी मराठीने प्रेक्षकांसाठी एक खास भेट आणली आहे.

आजपर्यंत झीच्या प्रत्येक मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. झीचा कलाकार हा मालिकेपुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या घरातील सदस्य बनला आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाचं ऋण जाणून झी मराठीने प्रेक्षकांना एक भेट द्यायचं ठरवलं आहे.

झी मराठीच्या लोकप्रिय मालिकांसाठी हा रविवार खास असणार आहे. कारण प्रत्येक मालिका एक खास वळण घेणार आहे.

यात पहिला क्रमांक आहे तो लागिरं झालं जी चा. ही मालिका सात वाजता प्रसारित केली जाणार आहे. शीतल आणि हर्षवर्धन यांच्या कुरघोडीत कोण बाजी मारेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

https://twitter.com/zeemarathi/status/1081818353402933248

राणा आणि अंजलीचा संसार सुखाने चालत असला तरी नंदिता वहिनी मात्र तो सुखाने चालू देतीलच असं नाही. मालिकेत सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे या मालिकेत राणा आणि  अंजलीचं पुन्हा लग्न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आज 8 वाजता प्रसारित होणा-या या मालिकेत राणा आणि अंजलीचं लग्न पुन्हा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल यात शंका नाही.

https://twitter.com/zeemarathi/status/1081556618884464640

रात्री 9 वाजता येईल राधिकाची बारी. बराच काळ टीआरपीमध्ये अव्वल असलेली ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. गुरु-शनायाच्या लग्नाला असलेला सुलक्षणाबाईंचा विरोध त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल हे आजच्या भागात कळेलच. त्यामुळे संध्याकाळी सात ते दहा आवडत्या मालिका पाहायला अजिबात विसरु नका.

https://twitter.com/zeemarathi/status/1081747935530897409

Recommended

Loading...
Share