By  
on  

कोराना आणि लॉकडाउनचा या सिनेमालाही बसला फटका, प्रदर्शन ढकलले पुढे

कोरोनाग्रस्त परिस्थिती आणि लॉकडाउनचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला. मनोरंजन विश्वाचे काम तर ठप्प झालेच मात्र जे सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर होते त्याचं प्रदर्शन रखडलं. काहींना हे सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित केले तर काही हे सिनेमे परिस्थिती पुर्ववत झाल्यावर प्रदर्शित करण्याचं ठरवलं.

'डार्लिंग' या मराठी सिनेमाच्या बाबतीतही असच झालय. 12 जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. मात्र सध्या चित्रपटगृहे बंद असल्यानं या सिनेमाचं प्रदर्शनही रखडलं आहे. त्यामुळे या सिनेमाच्या टीमने या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहेत. त्यांनी प्रदर्शित केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं लिहीलय की, "कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आम्ही 'डार्लिंग' या आमच्या आगामी सिनेमाचं प्रदर्शन पुढे नेत आहोत. 'डार्लिंग' यापूर्वी 12 जून 2020 ला प्रदर्शित होणार होता. आम्हाला आशा आहे की चित्रपटगृह पुन्हा उघडताच आणि आपण सर्व सुरक्षित असाल तेव्हा आपली भेट होईल. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. लवकरच भेटू थिएटरमध्ये- टीम डार्लिंग"

 

तेव्हा परिस्थिती पुर्ववत झाल्यावर जेव्हा सिनेमागृहे सुरु होतील तेव्हा हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा या टीमचा मानस आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात रितीका श्रोत्री झळकणार आहे. सिनेमाच्या मोशन पोस्टरनंतर सिनेमाची पहिली झलकही प्रदर्शित करण्यात आली होती.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Important Announcement!!! ##darling

A post shared by Darling - डार्लिंग (@darlingmarathimovie) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive