By  
on  

या गाण्याचं कॅप्शन देत पूजा सावंतने पोस्ट केले हे सुंदर फोटो

अभिनेत्री पूजा सावंतचे एकापेक्षा एक सुंदर फोटो तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पाहायला मिळतात. कधी ग्लॅमरस तर कधी पारंपारिक वेशभुषेतील फोटो ती सोशल मिडीयावर पोस्ट करते.

 

सध्या लॉकडाउनच्या काळातही ती काही फोटो पोस्ट करताना दिसतेय. मात्र नुकतेच पोस्ट केलेले साधे, सुंदर फोटोही आकर्षणाचा भाग ठरत आहेत. चाहत्यांनाही पूजाचा हा साधा, सुंदर लुक आवडलाय.

विशेष म्हणजे तिच्या या पोस्ट केलेल्या फोटोंचं कॅप्शनही सगळ्यांना आवडतय. वेक अप सिद सिनेमातील इकतारा हे गाणं तिने कॅप्शन म्हणून लिहीलं आहे.

गुलाबी रंगाची कुर्ती घातलेली पूजा खिडकीपाशी बसली आहे. हे सुंदर क्षण आणि कॅप्शनचं छान कॉम्बिनेशन पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive