By  
on  

स्वप्निल आणि मुक्ताच्या या प्रसिध्द सिनेमाला पूर्ण झाली 10 वर्षे

मुंबई आणि पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकर दोघांनाही नवा नाही. मात्र हाच वाद मजेशीर पध्दतिने सिनेमाच्या रुपात समोर आणला ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमात. सतिश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी झळकली होती. दोघांचा मुंबई-पुणे वाद, त्यांचे संवाद, सिनेमाची गाणि, स्वप्निल-मुक्ताचा अभिनय, त्यांची जोडी या सगळ्याच गोष्टी स्पेशल ठरल्या. आजही मुंबई-पुणे असा मजेशीर वाद झाला तर या सिनेमाची आठवण निघतेच. नुकतेच या सिनेमाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेता स्वप्निल जोशीने याच निमित्ताने पोस्ट करून हा आनंद व्यक्त केला आहे.

स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो की,  “कारण प्रेम TIMELESS असतं...मुबई-पुणे-मुंबई सिनेमाची अप्रतिम 10 वर्षे.” या सिनेमातील स्वप्निल जोशी आणि  मुक्ता बर्वेची जोडी आणि दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

या सिनेमाचा नंतर दुसरा आणि तिसरा भागही प्रदर्शित झाला. मात्र पहिल्या भागावरचं प्रेक्षकांचं प्रेम कायम आहे आणि ते कायमच राहील एवढं नक्की. हा सिनेमा मराठी सिनेमांच्या चाहत्यांसाठी कायम खास राहील यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive