By  
on  

शेवंता झळकली या भूमिकेत, शेवंताचा नवा अवतार

‘रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंता भूमिकेतून प्रसिध्द झालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
सध्या लॉकडाउनच्या काळात चित्रीकरण बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकार मागील काही महिन्यांपासून घरातच आहेत. या काळात काही कलाकारांना घरातच राहून काही व्हिडीओ तयार केले. यातच अपूर्वा नेमळेकरलाही एक कल्पना सुचली. ती कल्पना म्हणजे यूट्यूब चॅनल काढण्याची. अपूर्वाने नुकतच तिचं यूट्यूब चॅनल सुरु केलं आहे. या चॅनलच्या माध्यमातून ती एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

शेवंता म्हणून प्रसिध्द असलेली अपूर्वा आता एका नव्या भूमिकेत दिसत आहे. या नव्या भूमिकेचं नाव आहे शकी सोनू. ही शकी सोनू आणि तिचा अंदाज फारच हटके आहे. नुकताच या भूमिकेतील पहिला एपिसोड अपूर्वाने प्रदर्शित केला आहे. ही भूमिका आहे एका हाऊस वाईफ महिलेची. तिचा हटके अंदाच पहिल्याच भागात तिच्या चाहत्यांना आवडला आहे. तेव्हा शेवंतानंतर ही शकी सोनूही तितकीच प्रसिध्द होऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही. 

Recommended

PeepingMoon Exclusive