‘सोनाली सांगते ऐका’ या पॉडकास्ट कार्यक्रमातून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या आयुष्यातील विविध गोष्टींवर दिलखुलास बोलताना दिसत आहे. नुकत्याच रिलीज केलेल्या भागात तिने आणखी एका प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.
पुण्यातून मुंबईत आल्यानंतरमुंबईत स्वत:चं घऱ असावं हे स्वप्न सोनालीचं स्वप्न होतं. तेव्हा करियरचा स्ट्रगल सुरु असताना म्हाडाच्या लॉटरीविषयी सोनालीला कळालं होतं. अभिनेता सुशांत शेलारने सोनालीला फॉर्म भरण्यासाठी मदतही केली होती. आणि सोनालीला म्हाडाची लॉटरी लागली होती. यातूनच सोनालीने चेंबुरमध्ये स्वमालकीचं घर घेतलं. याविषयी ती म्हणते की, “वयाच्या 21व्या वर्षी स्वमालकीचे घर मुंबईत घेऊ शकले.घरच्यांच्या डोळ्यात माझ्याविषयीचं कौतुक दिसायचं आणि अजूनही दिसतं.माझ्या करियरमध्ये माझ्या भावाचाही त्याग मौलाचा आहे.”
मात्र यासोबतच प्रसिध्दी मिळत असताना सोनालीच्या आयुष्यात एक नकारात्मक गोष्ट घडली. एका कार्यक्रमाला नकार दिल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या निर्मात्याने सोनालीला धडा शिकवण्यासाठी काय केलं याविषयी ती या पॉडकास्टमध्ये सांगते. ती सांगते की, “म्हाडाच्या घराच्या बाबतीत चुकीच्या बातम्या समोर आल्या होत्या. मुख्यमंत्री अप्सरेवर फिदा असं म्हणत बातम्या झाल्या होत्या. मला अशा पद्धतीचं घर कधीच मिळालं नव्हतं. मी आज पहिल्यांदाच याविषयीची महत्त्वाची गोष्ट या पॉडकास्टमधून सांगणार आहे.” पुढे सोनाली म्हणते की, “एका कार्यक्रमासाठी मला त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना नकार द्यावा लागला होता. मात्र त्या व्यक्तिला माझ्या नकाराचा खूप त्रास झाला. आणि त्या व्यक्तिने मला धडा शिकवण्याचं ठरवलं.त्या व्यक्तिने म्हाडाच्या घराविषयी चुकीची बातमी पसरवली. मला तो वाद वाढवण्याची गरज नव्हती म्हणून याविषयी जास्त बोलले नव्हते. पण आता हे सगळं बोलून मनावरचं हे ओझं कमी झालं.”
याविषयी सोनालीने या पॉडकास्टच्या भागात या प्रकरणाविषय़ीच्या गोष्टी सविस्तर सांगीतल्या आहेत. ते जाणून घेण्यासाठी सोनालीच्या पॉडकास्टचा हा पूर्ण भाग नक्की ऐका.