By  
on  

या हॉररपटात झळकणार अभिनेता स्वप्निल जोशी, सुरु आहे पोस्ट प्रॉडक्शनचं काम

पौराणीक मालिका, रोमँटिक सिनेमे आणि विविध भूमिका साकारल्यानंतर अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच एका हॉररपटात झळकणार आहे. बळी असं या सिनेमाचं नाव आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. लपाछपी या मराठी सिनेमाचही त्यांनीच दिग्दर्शन केलं होतं.

सध्या लॉकडाउनमुळे सिनेमागृहे बंद असल्याने काही सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यातच 'बळी' हा सिनेमा कधी आणि कुठे प्रदर्शित होईल याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र याच सिनेमाविषयीची महत्त्वाची माहिती नुकतीच स्वप्निल आणि विशाल यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. ती बातमी म्हणजे सध्या या सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शन सुरु आहे. तेव्हा या सिनेमा प्रदर्शित कधी होईल हे सध्या गुलदस्त्यातच आहे.

 

लवकरच सिनेमाच्या प्रदर्शनाची विषयीची माहिती या सिनेमाची टीम घोषीत करेल एवढं नक्की.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive