तत्ववादी कुटुंबाच्या व्हॉट्सएप ग्रुपमध्ये झाली सानवीची एन्ट्री, सानवी येताच पाहा काय घडलं

By  
on  

सध्या टेलिव्हिजनवर जुन्या मालिका, त्यांचे जुने भाग पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या मालिका आणि मालिकेतील कलाकारांना मिस करत आहेत. यातच कलर्स मराठी वाहिनीने या कलाकारांचे व्हॉट्सएप ग्रुप चॅट तयार केले आहेत. या ग्रुप चॅटमधील मनोरंजक संवाद सोशल मिडीयावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

हे मन बावरे या मालिकेतील तत्तवादी कुटुंबाचा ग्रुपमधील संवाद नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओत दाखवण्यात आला आहे. तत्ववादी कुटुंब एकमेकांशी संवाद साधत असताना अचानक या ग्रुपमध्ये सानवीची एन्ट्री होते. सानवीची ग्रुपमध्ये एन्ट्री होताच ती ग्रुप एडमीन बनण्याचा हट्ट करते. सिध्दार्थ ग्रुपवर सानवीचा हा हट्ट पूर्ण करतो. मात्र त्यानंतर जे घडतं ते पाहणं मजेशीर आहे. सानवी ग्रुप एडमीन होताच इतर ग्रुप मेंम्बर्स या ग्रुपमधून लगेच लेफ्ट होतात. हा मजेशीर संवाद या व्हिडीओत पाहणं मनोरंजनात्मक आहे.

 

सध्या लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम बंद आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या या कलाकारांना मिस करणाऱ्या प्रेक्षकांना हे कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून भेटत आहेत.

Recommended

Loading...
Share