लॉकडाउनच्या काळात जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या. यात रामायण आणि महाभारत या प्रसिद्ध पौराणीक मालिकांचेही पुन:प्रक्षेपण करण्यात आले. घरात बसलेल्या प्रेक्षकांनी पुन्हा या जुन्या मालिकांना भरपुर प्रसिदात दिला. लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात 'रामायण' ही मालिका तर जगभरात सगळ्यात जास्त पाहिली गेलेली मालिका ठरली होती.
मात्र आणखी एक जुनी पौराणीक मालिका प्रेक्षक पुन्हा आवडीने पाहत आहेत. ही मालिका म्हणजे श्री कृष्णा. अभिनेता स्वप्निल जोशी या मालिकेत श्री कृष्णाच्या भूमिकेत झळकला होता. या मालिकेने स्वप्निलच्या करियरला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होतं. आणि आता पुन्हा या मालिकेला प्रेक्षकांंचं भरपुर प्रेम मिळतय. नुकत्याच आलेल्या टीआरपी लिस्टमध्ये ही मालिका अव्वल ठरली आहे. एवढच नाही तर या टीआरपीमध्ये या मालिकेने रामायण आणि महाभारत मालिकेलाही मागे टाकलं आहे.
अभिनेता स्वप्निल जोशीलाही बातमी कळताच त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या टीमने मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत श्री कृष्णा मालिकेचा एक सीन पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये स्वप्निल लिहीतो की, " या सकाळी मला ही बातमी मिळाली की, श्री कृष्णा मालिकेने रामायण आणि महाभारत मालिकेचेही टीआरपी रेकॉर्ड मोडले आहेत. माझा भाऊ आणि टीएस मेम्बर दानिश शेखने हा व्हिडीओ बनवला आहे. बघा, राधेकृष्णा."
स्वप्निलने हा आनंद सोशल मिडीयावर शेयर केला आहे. तेव्हा पुन्हा एकदा त्याच्या या जुन्या मालिकेला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून स्वप्निन जोशी आनंदी आहे.