ब्लॉकबस्टर 'कोंबडी पळाली' गाण्याचं यांनी केलं होतं नृत्यदिग्दर्शन, शेयर केली आठवण

By  
on  

सध्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा ट्रेंड सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मिडीयावर जुन्या आठवणी, जुने फोटो नेटकरी पोस्ट करत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकार उत्साहाने त्यांच्या जुन्या आणि खास आठवणींना उजाळा देत आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील 'जत्रा' सिनेमातील 'कोंबडी पळाली' हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. तेव्हाच नाही तर हे गाणं आताही कुठे वाजलं की पाय थिरकायला लागतात.या धमाकेदार गाण्याची जादू आजही कायम आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या डान्स स्टेप्स या प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी. नुकतच उमेश यांनी याच खास आठवणींना उजाळा दिला आहे.

या गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यानच्या आठवणी आणि फोटो त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. 

 

या पोस्टमध्ये उमेश जाधव लिहीतात की, "ब्लॉकबस्टर कोंबडी पळाली गाण्याच्या चित्रीकरणाचे फोटो, या गाण्यासाठी डान्सर्स आणि असिस्टंट म्हणून काम केलेल कलाकार आज स्वतंत्र कोरिओग्राफर झाले आहेत. सगळ्यांसाठी मी खूश आहे. सगळ्यांना बाप्पाचा आशिर्वाद मिळू दे."

Recommended

Loading...
Share