By Devendra Jadhav |
23-Aug-2019
‘जत्रा’ या मराठी सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर सर्वांना ठेका धरायला भाग पाडणारी आणि दिग्दर्शिका म्हणून नवीन ओळख तयार करुन ‘काकण’ सिनेमातून प्रत्येकाला भावूक करणारीअभिनेत्री क्रांती रेडकरने आता अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’मध्ये एण्ट्री घेतली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर नंतर अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट टी’ मध्ये सहभागी होणारी क्रांतीरेडकर ही दुसरी अभिनेत्री आहे.
क्रांतीचे अनेक चाहते आहेत जे तिच्या अभिनयावर फिदा आहेत आणि वेळोवेळी तिला मनापासून दाद देखील देतात. क्रांती अभिनय तर उत्तम करतेच, तसेच तिच्यामध्ये असलेले दिग्दर्शन कौशल्यदेखील अप्रतिम आहे. दोन गोंडस जुळ्या बाळांची आई आणि IRS ऑफिसरची पत्नी असलेल्या क्रांती रेडकरने ‘अभिनेत्री’ आणि ‘दिग्दर्शिका’ अशी ओळख बनवल्यानंतर पुढे भविष्यात तिलाआणखी काही तरी नवी करु पाहायचं आहे.
ज्या व्यक्तींमध्ये टॅलेंट आहे आणि त्यांच्यातील टॅलेंट मराठी-हिंदी सिनेसृष्टीत पोहचवण्यासाठी ज्या माध्यमाची मदत किंवा मंच याची आवश्यकता असते तो मंच म्हणजे ‘प्लॅनेट टी’ ही एंजन्सी.
Read More