पाठक बाईंचा हा व्हिडीओ पाहून चाहते झाले फिदा 

By  
on  

सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीत सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न काही जण सोशळ मिडीयाच्या माध्यमातून करत आहेत. त्यातच मराठी कला विश्वातील काही कलाकार सोशल मिडीयावर सकारात्मक विचारांच्या पोस्ट करत आहेत. अभिनेत्री अक्षया देवधरनेही असचं सकारात्मक कॅप्शन लिहीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Be free ! Be happy ! Be positive! @bobaderahul26 ️️️

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून पाठक बाई म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री अक्षया देवधरचे सोशल मिडीयावर प्रचंड चाहते आहेत. याच चाहत्यांसाठी अक्षयाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'रोजा' या प्रसिद्ध हिंदी सिनेमातील 'ये हसी वादिया...'  या गाण्यावर अक्षयाची अदाकारी पाहायला मिळतेय. सोबतच अक्षयाने कॅप्शनमध्ये म्हटलयं की , “मुक्त राहा, आंनदी राहा आणि सकारात्मक राहा.”
अक्षयाचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडतोय. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

 

Recommended

Loading...
Share