By  
on  

सोनाली कुलकर्णीने स्विमींग पूलमध्ये असा लुटला आनंद

लॉकडाउनच्या आधीपासूनच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुबईत आहे. फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत ती दुबईत आहे. शिवाय याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोनाली आणि कुणालने दुबईत साखरपुडाही केला. 
सोनाली ही दुबईत सध्या कुणालसोबत क्वालिटी टाईम घालवतेय. नुकतच तिने काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केले आहेत. या पोटोंमध्ये सोनाली स्विमींग पूलमध्ये मजा लुटताना दिसतेय. ती लिहीते की, “पुन्हा पूलमध्ये येण्याचा आनंद..” असं म्हणत तिने हा आनंद शेयर केला आहे.


सोनाली आणि कुणाल मिळून त्यांच्या फिटनेसकडेही लक्ष देत आहेत. शिवाय दोघांविषयीचे खास क्षण सोनाली सोशल मिडीयावर शेयर करतानाही दिसतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive