कला विश्वातील कलाकारांचं त्यांच्या चाहत्यांसोबत एक अतूट नातं असत. हे नातं विविध पद्धतीने पाहायला मिळतं. त्या कलाकारावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते एक ना अनेक गोष्टी करतात. मग त्या कलाकारांना भेटण्यासाठी गर्दीत जाण्यापासून ते आवडत्या कलाकारांचं चित्र रेखाटणं असो. अभिनेत्री प्राजक्ता माळीचेही असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांनी प्राजक्ता प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आजवर विविधं गोष्टी केल्या आहेत. काहींनी भेटवस्तू पाठवून तर काहींनी तिचं चित्र रेखाटून.
लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळात प्राजक्ताने तिच्या या चाहत्यांनी तिच्यासाठी बवललं पेंटिंग, रेखाटलेलं चित्र, स्केच या सगळ्या गोष्टी सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत. शिवाय नुकतच तिला तिच्या फोनमध्येही आणखी गोष्टी सापडल्या आणि तिने त्याही पोस्ट केल्या. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "आज मोबाईल चाळला तर आणखी काही झक्कास पेटिंग्ज, स्केचेस सापडले..आत्यंतिक आभार"
या पोस्टमध्ये तिने तिच्या या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यामध्ये काही सुंदर पेटिंग आणि स्केचेस तर हुबेहुबे काढल्याचं पाहायला मिळतय. चाहत्यांकडून मिळालेलं चित्र स्वरुपी प्रेम प्राजक्तासाठी कायम खास असेल एवढं नक्की.