अभिनेता प्रसाद ओक हा एक वैविध्यपूर्ण अभिनेता आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिका, दिग्दर्शक म्हणून केलेल सिनेमे यात एक महत्ताची गोष्ट कायम त्याच्यासोबत राहील. 13 वर्षांपूर्वी ‘सारेगमप युद्ध ताऱ्यांचे स्वप्न सुरांचे’ या कार्यक्रमात प्रसाद ओकही सहभागी झाला होता. संगीताची आवड असलेल्या या कलाकाराने त्या पर्वात बाजी मारून अजिंक्यतारा बनला.
हा क्षण प्रसादच्या आयुष्यात अविस्मरणीय असल्याचं तो सांगतो. नुकतच या गोष्टीला तब्ब्ल 13 वर्षे पूर्ण झाली असून याची आठवण प्रसादने सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या कार्यक्रमादरम्यानचे फोटो त्याने पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये प्रसाद लिहीतो की, “सुरांनी मंतरलेले दिवस...युद्ध ताऱ्यांचे स्वप्न सुरांचे,सारेगमप, आज 13 वर्ष पूर्ण झाली... रसिकांच्या आणि मित्रमंडळींच्या प्रेमळ आशीर्वादानी मी "अजिंक्यतारा" झालो.
आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण.”
या खास आठवणींना प्रसादने उजाळा दिला आहे. शिवाय या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटोरुप क्षण त्याने पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमात इतरही काही कलाकार सहभागी झाले होते. मात्र प्रसाद ओकच्या आवाजाने आणि त्याच्या गायकीने रसिकांची मनं जिंकली होती.