By  
on  

‘भोसले’ सिनेमात ही आहे अभिनेता संतोष जुवेकरची कोस्टार ? सेटवरील फोटो केला शेयर

'भोसले' या आगामी सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर विलास ही भूमिका साकारतोय.. अभिनेता मनोज वाजपयी या सिनेमातील मुख्य पात्र साकारतोय. याच वर्षी सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. येत्या 26 जूनला हा सिनेमात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 
संतोष जुवेकरने नुकताच या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्याची सहकलाकार इप्शिता चक्रवर्ती सिंह पाहायला मिळतेय. या पोस्टमध्ये संतोष लिहीतो की, “शुटिंगच्या आठवणी, संतोष आणि इप्शिता यांची मैत्री आहे आणि भोसले सिनेमात विलास आणि सिता ?   काय असतील ? सांगा...... अरे सांगा सांगा.  भोसले येत आहे येत्या 26 जूनला सोनी लीववर.. स्टे ट्यून मित्रांनो.”   
तेव्हा या दोघांची ऑफस्क्रिन मैत्री असल्याचं संतोष या पोस्टमध्ये म्हणतोय, मात्र ऑनस्क्रिन या दोन भूमिका आणि त्यांचं नातं काय असेल हे सिनेात पाहायला मिळेल. 

या सिनेमात अभिनेता मनोज वाजपयी हा गणपत भोसले नावाच्या सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबलची भूमिका साकारत आहे. फेस्टिव्हल्समध्ये कौतुक झालेला हा सिनेमात आता येत्या 26 जूननंतर सोनी लिव्हवर पाहता येणार आहे.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive