By  
on  

दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता हा व्हिडीओ, गाडीत बसून थिरकल्या होत्या या अभिनेत्री

काही हटके दिसलं की ते व्हायरल होतच असं नाही तर त्यातला वेगळेपणा आवडणही तितकच गरजेचं असतं. दोन वर्षांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एकाच गाडीत बसलेल्या तीन अभिनेत्री आणि त्यांचा विविध पेहरावात प्रसिद्ध गाण्यांवर केलेला डान्स असा हा व्हिडीओ होता. अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण, चारु देसळे यात झळकल्या होत्या.

 

मराठी सिनेसृष्टीतील जुनी आणि नवी अशा प्रसिद्ध गाण्यावर या अभिनेत्री थिरकल्या होत्या. एकाच गाडीत विविध पेहराव आणि विविध प्रसिद्ध गाण्यांवर या तिघींनी परफॉर्म केलं होतं. विनय प्रतापराव देशमुख याने या व्हिडीओचं दिग्दर्शन केलं होतं. हा व्हिडीओ यूट्यूबसह विविध सोशल मिडीयावर चांगला व्हायरल झाला होता. या व्हिडीओला प्रदर्शित होऊन नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने या व्हिडीओची आठवण अभिनेत्री नम्रता गायकवाडने शेयर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive