By  
on  

महाराष्ट्राला पुन्हा हसवणार पु.लं, ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ सिनेमाच्या उत्तरार्धाचा टीझर प्रदर्शित

‘भाई’ म्हणजेच पु.ल.देशपांडे हे अवघ्या महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे यावर कुणाचंही दुमत नसेल. पुलंचा जीवन प्रवासाचा काही भाग महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या सिनेमात दिसला होता. या बायोपिकच्या उत्तरार्धाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

भाई – व्यक्ती की वल्लीच्या पहिल्या भागात पुरुषोत्तम पाहिले आता पुरुषोत्तमचे पु.लं कसे झाले हे दुस-या भागात दिसेल. थोडक्यात उत्तरार्धात पु.लंच्या व्यक्तीपासून ते व्यक्तीमत्त्वापर्यंतचा प्रवास पहायला मिळेल. या टीझरमध्ये अनेक प्रसिद्ध मंडळी दिसत आहेत. त्यामध्ये आचार्य अत्रे, भक्ती बर्वे, पंडित जवाहरलाल नेहरु, विजया मेहता, बाबा आमटे, बाळासाहेब ठाकरे अशी मंडळी भाईच्या उत्तरार्धात दिसून येतील.

मराठी सिनेमाच्या इतिहासात दोन भागात प्रदर्शित होणारा भाई – व्यक्ती की वल्ली हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. टीझरची सुरुवातच पु. लंच्या उत्तम सेन्स ऑफ ह्युमरने होते. हा उत्तरार्ध ८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. उत्तरोत्तर रंगत जाणा-या या टीझरमुळे सिनेमाची उत्सुकता वाढली आहे हेच खरं!

https://www.youtube.com/watch?v=sIFPZh2OSXg&feature=youtu.be

Recommended

PeepingMoon Exclusive