By  
on  

 'OMT' चा फुल फॉर्म आला समोर, सुरु होणार ऑनलाईन थिएटर ?

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी सोशल मिडीया हे महत्त्वाचं माध्यम बनलय. एखादी घोषणा करायची असेल तर याच माध्यमाचा वापर जास्त केला जात आहे. काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील काही कलाकार हे OMT असं पोस्ट करत आहेत. शिवाय याचा फुल फॉर्मही नेटकऱ्यांना विचारत होते. मात्र याच शोध काही नेटकऱ्यांना लागला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

OMT तुम्हाला काय वाटतं ? OMT म्हणजे काय ?? . . . #OMT

A post shared by Mayuri Wagh (@mayurri.wagh_official) on

याच OMT चा फुल फॉर्मही आता हे कलाकार पोस्ट करू लागले आहेत. 'ऑनलाईन माझं थिएटर' असा याचा फुल फॉर्म आहे. बऱ्याच मराठी कलाकारांनी ही पोस्ट केली आहे. मात्र याविषयी नेमक काय समोर येईल हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. थिएटर आता ऑनलाईन येणार का ?, किंवा नाटकं ऑनलाईन पाहता येतील का ? असे अनेक प्रश्न आणि तर्क वितर्क सध्या लावले जात आहेत. लवकरच याविषयीची माहिती समोर येईल. अभिनेता सुनील बर्वे यांची 'सुबक' नावाची नाट्यसंस्था आहे. आणि या पोस्टमध्ये, पोस्टरवर 'सुबक'चा उल्लेख पाहायला मिळतोय. त्यामुळे हा नवा प्रयोग सुबकची निर्मिती असणार एवढं नक्की.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#OMT #secretrevealed #omt ️

A post shared by Hemangii Kavi (@hemangiikavi) on

Author

Recommended

PeepingMoon Exclusive