नटखट फोटो पोस्ट करत अमृताने मैत्रीण सईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या मराठीतील दोन हॉट, ग्लॅमरस आणि महत्वाचं म्हणजे आघाडीच्या अभिनेत्री. असं म्हणतात, दोन अभिनेत्रींचं कधीच पटत नाही. त्यांच्यांत नेहमीच खटके उडतात ....पण हे सई आणि अमृताने सपशेल फोल ठरवलंय. एखाद्या अभिनेत्रीने आपल्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रीसाठी पोस्ट करणं हे फक्त मराठी सिनेसृष्टीतच होऊ शकतं. आज २५ जून हा सई ताम्हणकरचा वाढदिवस. म्हणूनच सईसाठी अमृताने खुप खास पोस्ट शेअर केली आहे. 

अमृताने सईसोबतचा एक नटखट फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. या गोड पोस्टवरुनच दोघींमधलं खास बॉन्डींग तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@saietamhankar #saidaaaaa I adore you . Period . #happybirthdaysaitamhankar Here’s to more #bondicherries

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर या दोघींनी अलिकडेच एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.  पॉंडीचेरी हा त्यांचा आगामी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांनी केलं आहे. तर अभिनेता वैभव तत्त्ववादीसुध्दा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. 

Recommended

Loading...
Share