एकदा काय झालं... ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी Dubbing सुरु केलं

By  
on  

पुनश्च हरि ओम म्हणत अनेक मालिका आणि सिनेमांच्या शूटींगला पुन्हा सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी .यांनी आपला आगामी सिनेमा एकदा काय झालंचं एक नवंकोरं पोस्टर सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणलं होतं. आता नुकतंच त्यानी सिनेमाच्या डबिंगला सुरुवात झाल्याची पोस्ट केली आहे. 

डॉ.सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे हे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. आज मोहनजींसोबत एकदा काय झालं..सिनेमाच्या डबिंगला सुरुवात झाल्याचं सलील यांनी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन सांगितलं. 

आता सिनेसृष्टीतील सिनेमांच्या कामांना हळूहळू वेग लागला आहे. पोस्ट प्रोडक्शनची कामं , अर्धवट राहिलेलं शूटींग योग्य ती खबरदारी घेत पूर्ण करण्यात येत आहे. वेडींगचा शिनमानंतर गायक-संगीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे एकदा काय झाल...हा नवा कोरा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. लॉकडाऊनमुळे याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम लांबणीवर पडलं होतं, परंतु अनलॉकमध्ये आता हळूहळू सर्व सिनेमांसारखंच याच्यासुध्दा कामाला वेग आला आहे. 

Recommended

Loading...
Share