By  
on  

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवची कळकळीची विनंती

एकीकडे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळालय. मात्र यात त्यांच्या परिवाराचं आणि त्यांचं जीवन उध्वस्त होऊ नये यासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधव जनजागृती करतोय. गेली कित्येक वर्षांपासून सिध्दार्थ जाधव हा व्यसनमुक्ती अभियानाचा ब्रँड एम्बेसेडर आहे. आणि या माध्यमातून तो व्यसनमुक्त होण्यासाठी आवाहन करत असतो. तो स्वत:ही निर्व्यसनी आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवसानिमित्त त्याने सगळ्यांना कळकळीची विनंती केली आहे. त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून ही विनंती केली आहे.

 

या व्हिडीओत सिध्दार्थ म्हणतो की, “आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. जायचं तर सगळ्यांनाच एकत्र आहेच मात्र आपण कसे जातो हे आपल्या हातात आहे.  दारू, गांजा, सिगरेट, ड्रग्ज घेऊन जायचय की चांगली कामं करून जायचय की तंदरुस्त राहून जायचं हे तुम्ही ठरवा. या सगळ्यामुळे आपलं आयुष्य उध्द्वस्त होतच पण आपल्या आई-वडिलांचं आणि आपल्या घरच्यांचं आयुष्य उध्वस्त होतं. आपणं आपलं आणि घरच्यांचं आयुष्य उध्वस्त करायचं नाही. आणि आज एक शपथ घ्या की, से नो टू ड्रग्ज से हाय टू लाईफ.”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive