बॉलिवूडमध्ये जसा स्टार किड्सचा बोलबाला असतो तसा आता मराठी सेलिब्रिटींच्या मुलांचींही सोशल मिडीयावर चर्चा रंगते. बिग बॉस मराठी फेम पुश्की म्हणजेच अभिनेता पुष्कर जोगची गोंडस चिमुकली फेलिशा ही क्युटनेसमध्ये बेबोच्या तैमूरला आणि सोहाच्या इनायलाही मागे टाकतेय. हेच फेलिशाच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतंय. पुष्कर नेहमीच सोशल मिडीयावर एक्टीव्ह असतो. त्याचे आगामी प्रोजेक्टस् चाहत्यांसोबत शेअर करतो, पण यासर्वात चाहते जास्त पसंती देतात ते पुष्कर आणि त्याच्या क्युट फेलिशाच्या व्हिडीओजना.
या व्हिडीओत फेलिशा पेंटीग करत रंगांमध्ये हात माखवत घरबर दंगा करताना पाहायला मिळतेय. चाहत्यांनी पुष्करने शेअर केलेल्या फेलिशाच्या या गोड व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.
ह्या व्हिडीओमध्ये फेलिशा एका शानदार मोठ्या बॉससारख्या खुर्चीवर बसून फोनवर गोड हॅलो... हॅलोचा घोष करतेय. तिच्या निरागस आवाजातला हा व्हिडीओ पाहायला खुपच मजा येतेय.
बिग बॉस मराठी 2 फेम पुष्कर आता ‘वेल डन बेबी’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अमृता खानविलकर आहे. यापुर्वी तो ‘ती अॅण्ड ती’ सिनेमातून रसिकांसमोर आला होता.