By  
on  

‘आया रे सबका बाप रे’ म्हणत ठाकरे सिनेमातील गाण्याची मोहिनी, पार पडला म्युझिक लाँच सोहळा

सध्या बायोपिक्सचा ट्रेंड सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. येत्या काही दिवसात अनेक बायोपिक प्रदर्शासाठी तयार असतील. त्याच यादीतील एक दमदार नाव म्हणजे ‘ठाकरे’ हा सिनेमा.

शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने यापूरी रसिकांची वाहवा मिळवली होती. आता या सिनेमातील गाण्यानेही अशीच लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली आहे.

 

या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलात हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत, चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव हे उपस्थित होते. अत्यंत जोशपूर्ण ताल असलेलं हे गाणं नकाश अजीज यांनी गायलं आहे. संगीत रोहन रोहन यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रातील ढोल वाद्यांचा या गाण्यात खुबीने उपयोग करण्यात आला आहे.

अत्यंत जोशाने परिपूर्ण असलेल्या या गाण्यात बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा जनमानसावर असलेला प्रभाव सहजासहजी दिसून येतो. बाळासाहेबांच्या वेषातील नवाजचा वावर अगदी सहज आहे. त्यामुळे हे गाणं जास्त प्रभावी वाटतं.

https://www.youtube.com/watch?v=lGe_zgkjXMQ

 

Recommended

PeepingMoon Exclusive