आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आणि लाघवी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री गायिका म्हणजेच केतकी माटेगावकर.केतकीच्या गाण्याप्रमाणेच तिच्या अभिनयालासुध्दा रसिक मनापासून दाद देतात. केतकी ही सोशल मिडीयावरुन नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहणं पसंत करते. नुकताच केतकीने तिचा बोल्ड आणि स्टायलिश लुक शेअर करत चाहत्यांना सुखद सरप्राईज दिलं आहे.
डेनिमचे शॉर्टस आणि जॅकेट या स्टायलिश लुकमध्ये केतकी खुप खुलून दिसतेय.
शाळा, टाईमपास, काकस्पर्श, फुत्ंरु सारख्या सिनेमातून भेटीला आलेली अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकरने आपल्या सिनेमातून नेहमीच रसिकांची वाहवा मिळवलीय.
महेश मांजरेकरांच्या 'पांघरूण' या आगामी सिनेमात केतकीने 'निळाई' हे गाणं गायलं आहे. केतकीने गायलेल्या या गाण्याचं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने कौतुक केलं. खुद्द सलमानने गाण्याची दखल घेतल्याने केतकीचा आनंद 'सातवे आसमान पर'आहे.