By  
on  

आवडत्या नाट्यगृहात अभिनेत्री स्पृहा जोशी घेऊन येणार ही गोष्ट ?

सध्या लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प होतं. त्यातच सरकारच्या परवानगी नंतर आता हळूहळू चित्रीकरण पूर्ववत होताना दिसत आहे. मात्र सिनेमागृह आणि नाट्यगृह अद्याप बंदच आहेत. यातच अभिनेत्री स्पृहा जोशीने नुकतीच केलेली पोस्ट पाहून सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे.

स्पृहाने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत शुभारंभाचा प्रयोग, तुमच्या सर्वात आवडत्या नाट्यगृहात, रविवार 12 जुलै" असं यात लिहीलं गेलय. शिवाय कॅप्शनमध्ये स्पृहा लिहीते की, "काहीतरी श्रवणीय.. प्रेक्षणीय.. उत्साहवर्धक.. लवकरच."

 

स्पृहाच्या या व्हिडीओत नाटयगृहाचा उल्लेख आहे. तेव्हा स्पृहा नवं काय घेऊन येतेय, आणि ते कोणत्या नाट्यगृहात पार पडेल ? या सर्व प्रश्नांची उत्तर स्पृहा लवकरच देईल अशी अपेक्षा करूयात.

लॉकडाउनच्या काळात स्पृहाच्या 'खजिना' या लाईव्ह इन्स्टाग्राम शोला व्ह्यूवर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता स्पृहा आणखी काय नवं घेऊन येत आहे याचीच उत्सुकता आहे. स्पृहा ही एक उत्तम अभिनेत्रीसोबतच कवयित्रीदेखील आहे. तिच्या कवितांचा मोठा चाहता वर्ग आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive