सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून श्रृती मराठे ओळखली जाते. श्रृतीच्या सौंदर्यावर चाहते नेहमीच फिदा असतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रृती विविध मूड्समधले फोटो शेअर करते आणि चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव करतात.
निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली श्रृती मराठे ही जाहिरांतीमध्येही तितक्याच आत्मविश्वासाने झळकते.
श्रृतीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या श्रृतीचं सर्वत्र कौतुक झालं.
प्रसिध्द लेखक दिग्दर्शक प्रविण तरडेंच्या बहुचर्चित आणि ऐतिहासिक सरसेनापती हंबीरराव या आगामी सिनेमात श्रृती ही शिवाजी महाराजांच्या पत्नीच्या म्हणजेच राणी सोयराबाईंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
श्रृती 'बार्ड ऑफ ब्लड' या इम्रान हाश्मि स्टारर हिंदी वेबसिरीजमध्येसुध्दा झळकली होती.
अनेक मालिका आणि सिनेमांमधून श्रृती प्रेक्षकांवर नेहमीच भुरळ पाडते., तिच्या आगामी प्रोजेक्टसची सर्वांनाच उत्सुकता आहे.