अभिनेत्री अश्विनी भावे या अमेरिकेत असतात. त्याच्या तेथील राहत्या घरी अंगणात विविध फुलं-फळांची बाग आहे. त्यांच्या या बागेतील फुलं, झाडांविषयी त्या व्हिडीओतून सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगत असतात. नुकताच त्यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी घरात चक्क स्ट्रॉबेरी उगवल्याचं पाहायला मिळतय. एक नाही दोन नाही तर अनेक स्ट्रॉबेरी त्यांच्या कुंडीत उगवल्या आहेत.
या व्हिडीओत अश्विनी भावे त्यांनी या स्ट्रॉबेरी कश्या उगवल्या हे सांगत आहेत. शिवाय त्यांनी या स्ट्रॉबेरीच्या झाडासाठी कशी योग्य जागा आणि योग्य पॉटची निवड केली याविषय़ी त्या सांगत आहेत. त्या या पोस्टमध्ये लिहीतात की, "योग्य पॉट आणि योग्य जागेने ही जादू केली, माझ्या घरात उगवलेल्या स्ट्रॉबेरीची मी मजा लुटतेय. फ्रेश आणि ऑरगॅनिक."
'द ग्रिन डुअर' या त्यांच्या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या बागेतील फळं, फुलंझाडांविषयी सांगतात. याआधीही केलेल्या व्हिडीओंमध्ये त्यांनी त्यांच्या बागेतील घरात उगवलेल्या विविध फळं, फुलं, झाडांविषय़ी सांगीतलं आहे. अश्विनी भावे यांना निसर्गासह विविध फळं, फुलं, झाडांची प्रचंड आवड आहे.