By  
on  

प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते ही अभिनेत्री, आता चक्क पोस्ट केला स्विम सूटमधील फोटो

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील सोशल मिडीयावर सक्रिय असते. तिचे विविधं फोटो ती पोस्ट करताना दिसते. लॉकडाउनच्या काळात तर रसिकाचे विविध लुकमधील फोटो पाहायला मिळाले. कधी साडीतील तर कधी वर्कआउट आउटफीटमधील फोटो. या प्रत्येक लुकमध्ये रसिकाचे सुंदर फोटो चाहत्यांनी पसंत केले.

 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून शनाया म्हणून ही अभिनेत्री प्रसिद्ध झाली. त्यानंतर अचानक शिक्षणासाठी ती परदेशी गेली. त्यानंतर रसिकाचं बदललेलं रुप पाहायला मिळतय. रसिकाने स्वत:ला छान फिट ठेवलय. त्यासाठी ती वर्कआउटही करते. नुकताच तिने स्विम सूट घातलेला स्विमिंग पूलमधील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. रसिकाच्या या घायाळ करणाऱ्या अदा आणि हे फोटो सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive