By  
on  

 अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरात आली ही सुंदर पेंटिंग, पाहा काय आहे यामागचं कारण

लॉकडाउनच्या काळात अभिनेत्री अमृता खानविलकरच्या घरात एक सुंदर गोष्टी घडली आहे. अमृताला विविध सुंदर चित्रांची, पेंटिंगची आवड आहे. अशाच एका चित्रकाराच्या शोधात असताना तिला विजयालक्ष्मी विषयी माहिती मिळाली. तिच्याशी संपर्क झाल्यानंतर विजयालक्ष्मीने अमृतासाठी एक दैवी पेंटिंग पाठवली. हे पेंटिंग अमृताच्या घरात येताच एक वेगळं वातावरण निर्माण झालं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“The painter has the universe in his mind and hands “ - Leonardo Da Vinci And by the grace of god .....by the grace of “Durga “ herself this one of a kind artiste @artistvijayalaxmi brought life into my home today with this beautiful painting of Durga. I can’t even start to tell you the magical conversations I had with her in two hours ....but let me tell you this briefly “IF THINGS ARE MEANT TO COME YOUR WAY THEY WILL “ Started knowing @artistvijayalaxmi through Instagram after I searched for the artist who did the spectacular “shivagami” painting which went viral ... we got talking and got connected ... few days back when I called her for some paintings this what she sent me and I was zapped ... around a week back she msged saying it’s gupt navratri let me bring the Durga for you on durgashtami .... The gratitude I have for such moments in my life and for such amazing souls is unexplainable Thankyou laxmi as I m fondly going to call you now .... for bringing abundance in my life @artistvijayalaxmi

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

अमृताने याविषयीची पोस्ट करुन सविस्तर लिहीले आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की,“चित्रकाराच्या मनात आणि हातात विश्व आहे – लिओनार्दो दा विंची, देवाच्या कृपेने आणि दुर्गाच्या कृपेने आर्टिस्ट विजयालक्ष्मीने माझ्या घरात ही दुर्गा पेटिंग आणून जीवन आणलं. मी सुरुवात करुनही सांगू शकत नाही की दोन तासात कशा जादूई गप्पा आमच्यात झाल्या. जर गोष्टी आपल्या मार्गाने येण्यास तयार असतील तर येतातच. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विजयालक्ष्मीची ओळख झाली. तेव्हा मी व्हायरल झालेल्या एका शिवगामी पेंटिंगचा कलाकार कोण याविषयी शोधत होते. आणि आम्ही नंतर कनेक्ट झालो. काही दिवसांपूर्वी जेव्हा मी तिला कॉल केला तेव्हा तिने मला हे पेंटिंग पाठवलं. मग ती म्हटली की दुर्गाष्टमीला ही पेंटिंग घेऊन येते. मी माझ्या आयुष्यातील अशा क्षणासाठी कृतज्ञ आहे आणि याचं स्पष्टीकरण देणं कठीण आहे. धन्यवाद लक्ष्मी, मी आता तुला प्रेमाने अशीच हाक मारणार आहेमाझ्या आयुष्यात विपुलता आणण्यासाठी धन्यवाद.”

या पेंटिंगसाठी अमृताने अशाप्रकारे आभार व्यक्त केलं आहे. शिवाय या पेंटिंगसोबतचा क्लिक केलेला अप्रतिम फोटोही तिने पोस्ट केला आहे.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive