रितेश देशमुखच्या 'माऊली' या बहुचर्चित चित्रपटामधून सयामी खेर या अभिनेत्रीनो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सयामीने या आधी हिंदीमधील 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अभिनयाचे धडेसुध्दा गिरवले आहेत. 'रे' या तेलुगू चित्रपटात तिने लक्षवेधी भूमिका साकारली.पण नुकतंच ती वेब फ्लॅटफॉर्म गाजवतेय. अनुराग कश्यपच्या चोक या वेबसिरीजमधील सयामीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.
सयामी खेरचा आज वाढदिवस आहे, म्हणूनच तिच्या वाढदिवसानिमित्त तिचा माऊली सिनेमाचा नायक रितेश देशमुखने खास शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा तर आहेतच पण तुझं 'चोक'मधलं काम आणि आता 'ब्रिथ' या वेबसिरीजसाठी कौतुक आहे. तुला तुझ्या डिजीटल प्रवासासाठी खुप प्रेम आणि शुभेच्छा,....जमलंय बघा !'
'माऊली' सिनेमात रितेश आणि सयामीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच रंगली. तसंच सिनेमातली गाणीसुध्दा खुप लोकप्रिय झाली.