'वेल डन बेबी' हा मराठी सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे या सिनेमाचं काम थांबलं. लॉकडाउनच्या काळात बऱ्याच सिनेमांचं चित्रीकरण आणि इतर काम थांबलं. यात काही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. मात्र आता हळूहळू चित्रीकरणाचं काम सुरु झालं आहे. शिवाय सिनेमांची इतर कामही सुरु करण्यात आली आहेत.
यातच 'वेल डन बेबी' या सिनेमाचं डबिंगही पूर्ण करण्यात आलं आहे. नुकतीच याविषयीची माहिती अभिनेता पुष्कर जोगने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "सरकारच्या निटमांचं पालन करा आणि काळजी घ्या. गाफील राहू नका .. धोका अजून टळला नाहीये कारण आपण अजून जिंकलो नाहीये ...कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपल्याला जिंकायचे आहे ....नियम पाळू आणि कोरोना टाळू तेव्हाच म्हणू #वेलडनबेबी . 'वेल डन बेबी' चं डबिंग पूर्ण झालं आहे. पोस्ट प्रोडक्शनच्या फायनल स्टेजवर हा सिनेमा आहे.. प्रदर्शनाविषयीची माहिती लवकरच देऊ."
यासोबत या सिनेमाचं नाव असलेलं मास्क यात अभिनेत्री अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग यांंनी घातलं आहे. या सिनेमाचं आता पोस्ट प्रोडक्शन सुरु आहे. आणि लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख समोर येईल. मात्र हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार की प्रदर्शनासाठी सिनेमागृह सुरु होण्याची वाट पाहिली जाईल याची माहितीही लवकरच समोर येईल.