दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आणि खास आयोजित कार्यक्रमांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध भातील रसिकांना मिळते, पण यंदा करोना संकटामुळे हे जरी प्रत्यक्ष अनुभवता येत नसलं तरी आपल्या लाडक्या कलावंतानी रसिकांना घरबसल्या त्यांच्या सुरेल स्वरसाजात खास नव्या भक्तीगीतांमध्ये मंत्रमुग्ध करण्याचं ठरवलं आहे.
प्रसिध्द शास्त्रीय गायक आणि संगीतकार महेश काळे यांनी आषाढी एकादशीनिमित्त प्रदर्शित होणा-या त्यांच्या विठ्ठला या गाण्याची झलक नुकतीच चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हिंदी व उर्दू या भाषांमध्ये विठ्ठला हे गाणं सजल्याचं खास वैशिष्ट आहे. असं महेश यांनी सांगितलं आहे. वैभव जोशी यांनी हे गाणं शब्दबध्द केलं असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी त्याला संगीत दिलं आहे.
आषाढी एकादशीचीच्या मूहूर्तावर उद्या सकाळी म्हणजे, १ जुलै रोजी रसिकांच्या भेटीला येईल.