सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही सिनेसृष्टीतली खास लाडकी जोडी. अग्निहोत्र मालिकेमुळे छोट्या पडद्यावर त्यांची छान ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळली आणि प्रेक्षकांनासुध्दा ती खुप भावली. नील आणि सई हे तरुण जोडपं या मालिकेमुळे घराघरांत पोहचलं. त्यानंतर अनेक नाटकं आणि सिनेमांमधून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
मृण्मयी नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते . नुकतंच तिने सिध्दार्थसोबतच्या पोपटी चौकट या नाटकाची आठवण शेअर केली आहे. त्याच्या प्रयोगाला तब्बल १० वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त मृण्मयी नाट्यरसिकांना मित्र आणि सहअभिनेता सिध्दार्थ चांदेकरला विचारते, १० वर्ष झाली पोपटी चौकट च्या शेवटच्या प्रयोगाला .... करुया का परत एखादा प्रयोग???? काय मंडळी आवडेल का बघायला??
'लॉन्ग डिस्टंटन्स' रिलेशनशीपवर आधारित या जोडीचा मिस यू मिस्टर हा सिनेमा गेल्यावर्षी रसिकांच्या भेटीला आला होता. सर्वांनाच त्यांनी पुन्हा एकत्र एखाद्या प्रोजक्टमधून भेटीला यावं अशी इच्छा आहे.