प्रिया बापट आणि उमेश कामत या सिनेसृष्टीतील मेड फॉर इच अदरची जोडी म्हणजे यांना दृष्ट न लागो,अशीच जोडी म्हणावी आहे. दोघांची प्रमुख भूमिका असलेली वेबसिरीज 'आणि काय हवं सीझन १' आणि 'सीझन २' प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस उतरली. सर्वांनाच त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचं कौतुक वाटतं. जितके हे दोघं पडद्यावर रोमॅण्टीक आहेत, तितकेच प्रत्यक्ष आयुष्यातसुध्दा. ह्याचा प्रत्य नेहमीच त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन येतो. चला तर पाहूयात या जोडीचे काही खास रोमॅण्टीक फोटो.
प्रिया बापट आणि उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे.
दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात
आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग, किस्से ते चाहत्यांसोबत शेअर करतात.
कधी एकत्र स्वयंपाक करताना तर कधी वर्कआऊट करतानाचे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात.
प्रियाने काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये उमेशसाठी खास पोस्ट करत म्हटलं होतं, "देवाचे आभार....उमेश या लॉकडाऊनमध्ये तु माझ्यासोबत आहेस."
खरंच दोघंही अगदी मेड फॉर इच अदर कपल आहेत.
प्रिया उमेशच्या फोटोंवर चाहते नेहमीच लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतात.
आणि काय हवं... या वेबसिरीजमधील जुई आणि साकेतसुध्दा प्रेक्षकांना प्रचंड भावले.
तसंच लॉकडाऊन स्पेशल नवरा-बायको हा भाडीपचा खास व्हिडीओ प्रिया-उमेशने घरुनच शूट केलाय,त्यालासुध्दा चाहत्यांनी भरघोस पसंती दिली.
सर्वांनाच प्रिया-उमेशच्या लॉकडाऊननंतरच्या प्रोजेक्ट्सची उत्सुकता लागून राहिली आहे.