आदिनाथ कोठारे आणि दिप्ती देवीचा हा लघुपट प्रदर्शित

By  
on  

 लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील बराच कॉन्टेंट हा ओटीटीवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. काही सिनेमा सिनेमागृहे बंद असल्याने ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.
यातच मराठीतील मोस्ट अव्हेटेड शॉर्ट फिल्म ‘शेवंती’ही ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या लघुपटात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री दीप्ती देवी आहेत. लेखक, कवि चंद्रशेखर गोखले यांनी याचं लेखन केलं असून निलेश कुंजीर यांनी दिग्दर्शन केलं आहे. 

नुकताच हंगामा प्लेवर हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे. आदिनाथ कोठारेने सोशल मिडीयावर याविषयी माहिती देत लघुपटाचा ट्रेलरही पोस्ट केला आहे. 
शिवाय आदिनाथ कोठारे हा ‘83’ या सिनेमातही झळकणार आहे. या हिंदी सिनेमात आदिनाथ हा क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसेल. तर माधुरी दीक्षित नेनेंची निर्मित असलेल्या पंचक या आगामी सिनेमात अभिनेत्री दीप्ती झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share