II जगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी
पाहुनी सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी II
आज आषाढी एकादशी. या दिवशी पंढरपूरात वारक-यांचा अथांग जनसागर लोटतो. तो उत्साह अवर्णनीयच असतो. वर्षभर वारकरी बांधव वारीची आतुतेने वाट पाहतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या पावलांना या दरम्यान आपसूकच वेग येतो. पण कधीही न चुकलेली वारी आणि रिंगण सोहळ्यांना यंदा मात्र करोना संकटामुळे खंड पडला. पण मोजक्याच वारक-यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. यंदा प्रत्यक्ष श्री विठ्ठलाचं दर्शन याचि देहि, याची डोळा घेता येत नसलं तरी विठ्ठल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे.
सर्वांचा लाडका लय भारी अभिनेता रितेश देशमुख आणि श्रीहरी विठ्ठल यांचंही खास नातं आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर मराठीत लय भारी सिनेमाद्वारे रितेशन ेदमदार पदार्पण केलं. ह्या सिनेमाची कथासुध्दा पांडुरंगाच्या पंडरपुरनगरीत घडली व त्यात विठ्ठलाचा असीम भक्त माऊली या तरुण रितेशने साकारत चाहत्यांची भक्तांची मनं जिंकली. त्यानंतर गेल्यावर्षी माऊली या दुस-या मराठीसिनेमातूनसुध्दा रितेशची विठ्ठल भक्ती पाहायला मिळाली.